मिझोराममध्ये बस दरीत कोसळल्याने 11 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

ऐंजॉल (मिझोराम): राष्ट्रीय महामार्गावरून बस दरीत कोसळल्याने 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 6 महिलांचा सामावेश आहे. तर अन्य 19 जण या अपघातात जखमी झाले आहेत. लंगेली जिल्ह्यातील पंगज्वॉल गावाजवळ आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका खासगी बसला अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसचा चालक झोपला होता तर क्लिनर बस चालवत होता. ही बस राष्ट्रीय महामार्ग-54 वरून सुमारे 500 फुट कोसळली. बस अपघातात 9 जणांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य जखमींवर पंगज्वॉलच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व हाथीलाल सामाजिक आरोग्य केंद्रात उपचार होत आहेत. प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे सीहा जिल्हातील रहिवासी आहेत. सर्वांना दरीबाहेर काढण्यात यश आले आहे.'

Web Title: 11 killed 19 injured as bus falls into gorge in Mizoram