हैदराबादमध्ये इमारत कोसळून 11 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 11 डिसेंबर 2016

हैदराबाद- सायबराबादमधील नानकरामगुडा येथे नव्याने बांधकाम होत असलेली एक इमारत कोसळून त्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखालून दोघांना वाचविण्यात बचाव पथकाला यश आल्याची माहिती राज्य महापालिका प्रशासन मंत्री के. टी. रामा राव यांनी दिली आहे.

येथे एका सहा मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. गुरुवारी रात्री ती अचानक कोसळून त्याखाली तेरा जण अडकून पडले होते. यापैकी अकरा जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व कामगार असून, ते इमारतीखाली राहात होते. त्यांपैकी एक महिला व तिच्या बाळाला वाचविण्यात यश आले आहे. सदर मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याची माहिती राव यांनी दिली.

या इमारतीचे बांधकाम करताना नियमांची पायमल्ली झाल्याची बाब समोर आली असून, संबंधित बिल्डरला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाशी संबंधित महापालिकेतील दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राव यांनी दिली.

Web Title: 11 killed in building collapse in Hyderabad