त्रिपुरात ११ आमदारांना मंत्रिपदाची शपथ

डॉ. माणिक साहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज ११ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
11 mla tripura take oath as cabinet ministers raj bhavan agartala
11 mla tripura take oath as cabinet ministers raj bhavan agartalasakal

आगरताळा : डॉ. माणिक साहा यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर आज ११ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपच्या नऊ आणि ‘आयपीएफटी’च्या दोन आमदारांचा समावेश आहे. ‘आयपीएफटी’चे मेवर कुमार जमातिया वगळता माजी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना नवीन मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे,

त्रिपुराचे राज्यपाल एस.एन.आर्य यांनी राजभवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात या सर्व मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री डॉ.माणिक साहा, माजी मुख्यमंत्री विप्लवकुमार देव व इतर मान्यवर उपस्थित होते. मंत्रिमंडळात विष्णुदेव वर्मा, एनसी देववर्मा , रतनलाल नाथ, प्रणजित सिंघा रॉय, मनोजकांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुशांत चौधरी, रामपद जमातिया आणि प्रेम कुमार रेआंग कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतील, असे माणिक साहा यांनी रविवारी राज्यपाल आर्य यांना पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले होते. रामपद जमातिया हे भाजपचे दिग्गज आदिवासी नेते, आमदार आहेत तर प्रेमकुमार रेआंग आणि एन.सी.देववर्मा आयपीएफटीचे आमदार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com