मोक्षप्राप्तीसाठी 'त्या' 11 जणांची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

दिल्लीतील बुऱ्हाडी भागात एका घरात काल (ता.1) कुटुंबातील 11 जणांचे लटकलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता त्यांनी अंधश्रद्धेतून मोक्षप्राप्तीसाठी कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे  पोलिस तपासात समोर आले आहे. कुठल्याही प्रकारची चोरी किंवा लूट येथे झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील बुऱ्हाडी भागात एका घरात काल (ता.1) कुटुंबातील 11 जणांचे लटकलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. आता त्यांनी अंधश्रद्धेतून मोक्षप्राप्तीसाठी कुटुंबियांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे  पोलिस तपासात समोर आले आहे. कुठल्याही प्रकारची चोरी किंवा लूट येथे झाली नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुऱ्हाडी भागात राहणाऱ्या या कुटुंबाने अंधश्रद्धेतून मोक्षप्राप्तीसाठी सामूहिक आत्महत्या केली असल्याचे सांगितले आहे. या कुटुंबाचा दूधविक्रीचा व्यवसाय आणि किराणा दुकान व हार्डवेअरचे दुकान होते. शनिवारी (ता.30) रात्री ते किराणाचे दुकान बंद करून घरी गेले होते. रविवारी (ता.1) सकाळी त्यांच्याकडे दूध घेण्यासाठी  गेल्यावर असता त्यांच्या घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या कुटुंबात ज्येष्ठ महिला, दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, बहिणी आणि दोन मुले असे राहत होते. अकरापैकी दहा मृतदेहांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. 

स्थानिक नागरिकांच्या माहितानुसार हे कुटुंब खूप धार्मिक होते. या कुटुंबाचे प्रमुख ललित हे गेल्या पाच वर्षांपासून मौन व्रतात होते. गेल्या 22-23 वर्षांपासून हे कुटुंब या भागात राहत आहे. यापुढील तपास क्राईम ब्रँच करणार असल्याचेही पोलिसांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Web Title: 11 People Of The Same Family Found Dead in delhi