दिल्ली: घरात आढळले एकाच कुटुंबातील 11 लटकलेले मृतदेह

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

स्थानिक नागरिकांनी सांगितले, की हे कुटुंब खूप धार्मिक होते. तसेच त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. या कुटुंबाचे प्रमुख ललित हे गेल्या पाच वर्षांपासून मौन व्रतात होते. गेल्या 22-23 वर्षांपासून हे कुटुंब या भागात राहत होते. 

नवी दिल्ली : दिल्लीतील बुऱ्हाडी भागात एका घरात कुटुंबातील 11 जणांचे लटकलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुऱ्हाडी भागात राहणाऱ्या या कुटुंबाचे दूधविक्री, किराणा आणि हार्डवेअरचे दुकान होते. शनिवारी रात्री ते किराणाचे दुकान बंद करून घरी गेले होते. आज (रविवार) सकाळी त्यांच्याकडे दूध घेण्यास गेले असता त्यांच्या घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या कुटुंबात ज्येष्ठ महिला, दोन भाऊ, त्यांच्या पत्नी, बहिणी आणि दोन मुले असे राहत होते. या सर्वांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या महिलेचा तिसरा मुलगा सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, तो चित्तोडगड येथे असतो. अकरापैकी दहा मृतदेहांच्या डोळ्यावर पट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. ही सामुहिक आत्महत्या असल्याची शक्यता आहे.

स्थानिक नागरिकांनी सांगितले, की हे कुटुंब खूप धार्मिक होते. तसेच त्यांचे सर्वांशी चांगले संबंध होते. या कुटुंबाचे प्रमुख ललित हे गेल्या पाच वर्षांपासून मौन व्रतात होते. गेल्या 22-23 वर्षांपासून हे कुटुंब या भागात राहत होते. 

Web Title: 11 People Of The Same Family Found Dead Under Mysterious Circumstances At Their House In Delhi