काश्‍मीरमध्ये बस दरीत कोसळून 11 विद्यार्थी ठार

11 students dead after minibus falls into gorge in jammu kashmir
11 students dead after minibus falls into gorge in jammu kashmir

श्रीनगर : भरधाव टेंपो ट्रॅव्हलर दरीत कोसळून 9 विद्यार्थिनींसह 11 विद्यार्थी ठार झाल्याची घटना शोपियॉं जिल्ह्यात मुघल रोडवर पीर की गली येथे आज (गुरुवार) घडली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, त्यापैकी तीन गंभीर असून, त्यांना श्रीनगरला आणले आहे.

पूँच येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सहलीला जात होते. या अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिक, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. शोपियॉंचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहंमद सालेम यांनी 11 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 9 मुलींचा समावेश आहे. जखमी सात जणांना एसएमएचएस रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले. रस्ते खराब असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत चार मृतदेह काढण्यात आले आहेत.

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक म्हणाले, 'राज्यात ही अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल. शिवाय, जखमींना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com