विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू

विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने 12 जणांचा मृत्यू झाला. ही घटना हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर येथे घडली. आज (शुक्रवार) ही घटना समोर आली. तसेच उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथेही विषारी दारू प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. 

विषारी दारूमुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला. तर काहींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गंभीर प्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली असून, याप्रकरणाचा अधिक तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती हरिद्वारचे जिल्हाधिकारी दीपक रावत यांनी दिली. तसेच यापूर्वीही विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये पाच जणांचा समावेश आहे. तर 8 जणांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, प्रशासनाने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी 50 हजारांची आर्थिक मदतीची घोषणा केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com