...म्हणून 12 हजार वेबसाइट्स होणार ब्लॉक

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. तत्पूर्वी तमिळ चित्रपटांना पायरसीचा असलेला धोका लक्षात घेता मद्रास उच्च न्यायालयाने 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्सना 12 हजारांपेक्षा अधिक वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत.

नवा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन अनेक वेबसाइट्सवर उपलब्ध होते. यामध्ये तमिळ चित्रपटांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे याचा फटका अनेक चित्रपटांना बसत आहे. 'लाइका प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड'ने याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीश एम. सुंदर यांनी 37 इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर्सना 12 हजार वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. 

दरम्यान, 2.0 या चित्रपटाचा पहिला शो सुरू होण्यापूर्वी 12 लाख तिकिटे विकली गेली असल्याची माहिती चित्रपट समीक्षक रमेश बाला यांना दिली. सुमारे 600 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Web Title: 12 thousand websites will be blocked