टेम्पो चालकाने केला बारा वर्षाच्या मुलावर बलात्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

पंचकुळा (हरियाणा): टेम्पो चालकाने बारा वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पीडीत मुलाने आपल्याला त्रास होत असल्याची तक्रार वडिलांकडे केली होती. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत टेम्पो चालकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांनी शाळा सुटल्यानंतर एका टेम्पोमध्ये बसून घरी पाठवले होते. प्रवासादरम्यान टेम्पोचालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा करून मुलावर बलात्कार केला. मुलगा घरी आल्यानंतर त्याने त्रास होत असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान त्याच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. टेम्पो चालकाने बलात्कार केल्यानंतर याबाबत कोठेही वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली होती. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: 12 year old boy raped by tempo driver in Panchkula

टॅग्स