पुल पाण्याखाली असताना 12 वर्षाच्या मुलाने लावली जीवाची बाजी; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुसळधार पावसानं कर्नाटकातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. एवढ्या मुसळधार पावसात 12 वर्षांच्या मुलानं आपल्या जीवाची बाजी  लावत रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला आहे. त्याने माणुसकीचं अनोखं उदाहरण समोर ठेवल्याने सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

बंगळुरूः मुसळधार पावसानं कर्नाटकातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. एवढ्या मुसळधार पावसात 12 वर्षांच्या मुलानं आपल्या जीवाची बाजी  लावत रुग्णवाहिकेला रस्ता करुन दिला आहे. त्याने माणुसकीचं अनोखं उदाहरण समोर ठेवल्याने सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

रस्ता पाण्याखाली असतानाही या 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला अचूक मार्ग दाखवला. रायचूर जिल्ह्यातील रिरेरायनकुंपी गावात राहणाऱ्या या 12 वर्षांच्या मुलानं रुग्णवाहिकेला रस्ता दाखवताना आजूबाजूनं येणाऱ्या पाण्याच्या वेगाची पर्वाही केली नाही. तो पाण्याखाली गेलेल्या रस्त्यातूनही रुग्णवाहिकेला मार्ग दाखवत राहिला.

रुग्णवाहिकेत सहा मुलांसमवेत एका महिलेचा मृतदेह असल्याचे सांगण्यात येत आहे. 12 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या शौर्याबद्दल त्याला सन्मानित करण्यात आलं आहे. दरम्यान, या मुलाचे नाव व्यंकटेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे तो पूल पूर्णतः पाण्याखाली गेला त्यावेळी रुग्णवाहिकेच्या चालकाला पुलावरच्या पाण्याचा अंदाज घेणं कठीण असताना व्यंकटेशने शौर्याचे काम केले असल्याने सोशल मीडियावरही त्याचे कौतुक होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 12 year old felicitated for guiding ambulance across flooded bridge