खुशीने मिळवले 97 टक्के मार्क अन् घेतली दीक्षा

12 year old girl takes diksha to become Jain monk
12 year old girl takes diksha to become Jain monk

सुरत : गुजरातमधील 12 वर्षाच्या खुशी या विद्यार्थीनीने सहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवले. जगामध्ये आनंद हा क्षणापुरता असून, पुढील आयुष्य साधं जगण्यासाठी तिने दीक्षा घेतली आहे.

खुशीच्या कुटुंबात दीक्षा घेणारी ती पहिली व्यक्ती नाही. तिच्या कुटुंबातील चार जणांनी यापूर्वी दीक्षा घेतली आहे. जेंव्हा मी चार वर्षांची होते, तेव्हा कुटुंबातील चार जणांनी दीक्षा घेतली होती. खुशीला बुधवारी (ता. 29) जैन दीक्षा देण्यात आली. दीक्षा घेतल्यानंतर खुशी म्हणाली, 'जगामध्ये जो काही आनंद आहे तो क्षणापुरता आहे. साधं जीवन जगण्यामुळे शांतता व मोक्ष मिळू शकतो.'

खुशीचे वडील विनीत शाह हे सरकारी कर्मचारी आहेत. ते म्हणाले, 'आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. एकदा साध्वी झाल्यानंतर ती लोकांचे आयुष्य प्रकाशमय करण्याचे काम करेल. खुशीला सहावीमध्ये 97 टक्के गुण मिळाले आहेत. नोव्हेंबरमध्ये तिने शाळा सोडली. खुशीने हजारो किमी अंतर पायी चालत पूर्ण केले असून, दीक्षा घेतल्यानंतर आयुष्य कसे असते हे तिने जवळून पाहिले आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com