काश्मीरमधील १२४ वर्षीय महिलेने घेतली कोरोनाची लस

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (ता.2) कोरोनाचे 1 हजार 718 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Rehtee Begum
Rehtee BegumANI
Summary

जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (ता.2) कोरोनाचे 1 हजार 718 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

श्रीनगर : कोरोना संक्रमणाविरोधात सुरू असलेल्या युद्धात देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी हळूहळू लसींचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवित आहे. याच दरम्यान, बारामुल्लाच्या श्रकवाडा ब्लॉक वगुरा भागातील १२४ वर्षीय रेहती बेगम यांनाही लसीचा पहिला डोस दिला गेला. एएनआय वृत्तसंस्थेने जम्मू-काश्मीरच्या माहिती व जनसंपर्क विभागाचा हवाला देत ही माहिती दिली आहे. विभागाने वृद्ध महिलेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. (124-year-old Rehtee Begum from Baramulla Jammu Kashmir gets her first COVID-19 vaccine jab)

Rehtee Begum
हायकोर्टाच्या ऑनलाईन सुनावणीत वाजलं जुहीचं 'घुंघट की आड से...'

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे 1,718 नवीन रुग्ण

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (ता.2) कोरोनाचे 1 हजार 718 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 2 लाख 94 हजार 78 वर पोहोचली आहे. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमधील 3 हजार 963 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. ते म्हणाले की, नवीन प्रकरणांपैकी 585 जम्मू, तर 1 हजार 133 जण काश्मीर विभागातील आहेत.

Rehtee Begum
दुसऱ्या लाटेपक्षाही कोरोनाची तिसरी लाट अधिक भयावह असेल : SBI

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात उपचार घेत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 579 एवढी आहे. तर आतापर्यंत 2 लाख 58 हजार 536 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच मंगळवारी संध्याकाळपासून म्युकरमायकोसिस अर्थात काळ्या बुरशीचे (Black fungus) नवे दोन रुग्ण आढळले असून तेथील एकूण रुग्णांची संख्या १२ वर पोहोचली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com