भारतात सव्वाशे दहशतवादी - एनआयए

Terrorist
Terrorist

नवी दिल्ली - बांगलादेशमधील जमात उल मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) ही दहशतवादी संघटना भारतात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न करीत असून, या संघटनेने १२५ सदस्य विविध राज्यांमध्ये पाठविले आहेत, अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख वाय. सी. मोदी यांनी दिली.

दहशतवाद विरोधी पथकांच्या प्रमुखांची वाय. सी. मोदी यांनी आज बैठक घेतली. ‘जेएमबी’ने झारखंड, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये बांगलादेशी निर्वासितांच्या माध्यमातून सदस्य पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेएमबी’ने २०१४ ते २०१८ या कालावधीत बंगळूरमध्ये २० ते २२ अड्डे तयार केले आणि त्याआधारे दक्षिण भारतात हातपाय पसरण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. या संघटनेने कर्नाटक सीमेवरील कृष्णगिरी टेकड्यांमध्ये रॉकेट लाँचरची चाचणीही घेतली होती, असे ‘एनआयए’चे महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, ‘इसिस’शी संबंध असल्यावरून देशभरात आतापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली असून, यातील बहुतेकांनी वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईक याचे व्हिडिओ पाहून दहशतवादाचा मार्ग निवडल्याचे कबूल केले आहे, असेही मित्तल यांनी सांगितले. नाईक सध्या मलेशियात असून त्याला ताब्यात देण्याची भारताची मागणी आहे. 

दोन दहशतवादी पकडले
गंदरबल : हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्‍मीर पोलिसांनी गंदरबल येथे अटक केली. त्यांच्याकडून एक-४७ रायफल आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. 

पंधरा दिवसांत जम्मू-काश्‍मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू असून, त्याअंतर्गत ही पाचवी मोहीम आहे. २८ सप्टेंबर रोजी बटोट रामबन जिल्ह्यात हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com