जम्मूमधील अपघातात 13 यात्रेकरू जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 जुलै 2018

उधामपूर जिल्ह्यापासून 70 किमी अंतरावर असणाऱ्या मल्लार्ड भागातील धर्मा पुलावर झाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.  

जम्मू : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. चारचाकी वाहन आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला. या अपघातात 13 अमरनाथ यात्रेकरू जखमी झाले. हा अपघात आज (गुरुवार) झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

अमनाथ यात्रेसाठी भाविकांची गर्दी होत आहे. पहिल्या बॅचमध्ये 3419 यात्रेकरू असून, यामध्ये 680 महिला आणि 201 साधूंचा समावेश आहे. सध्या हे सर्व भगवतीनगर बेस कॅम्पपासून काश्मीरला जात होते. याबाबत येथील अधिकाऱ्यांनी माहिती दिली, की हा अपघात उधामपूर जिल्ह्यापासून 70 किमी अंतरावर असणाऱ्या मल्लार्ड भागातील धर्मा पुलावर झाला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.  

दरम्यान, अमरनाथ यात्रेसाठी आलेले यात्रेकरू एका वाहनातून जात असताना हा अपघात झाला. यामध्ये 13 यात्रेकरू जखमी झाले आहेत. या सर्वांवर उधामपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

Web Title: 13 Amarnath pilgrims injured after their vehicle rams into truck near Jammu