Syria : अमेरिकेन सैन्याचं ऑपरेशन; 13 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानच्या सीमेजवळ रात्रभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.
Team eSakal
Team eSakalAFP News

सीरियाच्या (Syria) उत्तर-पश्चिम भागात अमेरिकेच्या (America) स्पेशल ऑपरेशन्स टीमच्या सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात काही लहान मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि बंडखोर सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार इडलिब प्रांतातील तुर्कस्तानच्या सीमेजवळ रात्रभर चाललेल्या ऑपरेशनमध्ये सात मुलं आणि तीन महिलांसह किमान 12 लोक मारले गेले.

Team eSakal
पाकिस्तानमध्ये लष्कारावर मोठा दहशतवादी हल्ला, चार दहशतवादी ठार

दाट लोकवस्तीच्या भागात हा हल्ला झाला. या भागात सीरियाच्या युद्धातून विस्थापित झालेले हजारो लोक छावण्यांमध्ये राहतात. अनेक रहिवाशांनी, भीतीमुळे नाव न छापण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेशी बोलताना, नागरिकांच्या मृत्यूबद्दलची माहिती दिली. घटनास्थळी मृतांच्या अवयवांचा खच पडलेला असल्याचं त्यांनी सांगितलं.

Team eSakal
दहा अब्ज डॉलर खर्च करुनही 'मेटा'ला झाला तोटा; 'हे' आहे कारण

जोरदार गोळीबार

पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी म्हणाले की, "यूएस सेंट्रल कमांडच्या नियंत्रणाखाली असलेल्या यूएस स्पेशल ऑपरेशन्स सैन्याने आज संध्याकाळी सीरियाच्या वायव्ये भागात दहशतवादविरोधी मोहीम राबवली." रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार संशयित अल कायदा-संबंधित दहशतवाद्याला लक्ष्य केलं गेलं होतं, मात्र त्या व्यक्तीच्या ओळखीबद्दल इतर कोणतीही माहिती नाही, तसंच या हल्ल्यात तो मारला गेला की नाही, याबद्दलही वृत्त नाही. रहिवाशांनी सांगितलं की त्यांनी कारवाईदरम्यान जोरदार गोळीबार झाल्याचं ऐकलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com