काश्मीरमध्ये दहशतवादी स्फोटात 13 जवान हुतात्मा

13 CRPF jawans martyred in IED blast in J&K s Pulwama district
13 CRPF jawans martyred in IED blast in J&K s Pulwama district

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज (गुरुवार) घडवून आणलेल्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 13 जवान हुतात्मा तर 20 जखमी झाले आहेत.

पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगर-जम्मू महामार्गावर असलेल्या अवंतीपुरा भागात दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोटाद्वारे जवानांचे वाहन उडविले. या स्फोटात 13 जवान हुतात्मा झाले असून, 20 जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जैश-ए-मोहम्मद संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली.

दरम्यान, स्फोट घडवून आणलेला परिसर जवानांनी ताब्यात घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com