पश्‍चिम बंगालमध्ये वीज कोसळून 13 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 30 एप्रिल 2018

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या विविध भागांत काल रात्री वीज कोसळून किमान 13 जण ठार झाले तर अन्य 25 जण जखमी झाले, अशी माहिती राज्य आपदा निवारण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या मरण पावलेल्या 13 जणांपैकी नादीआ, मुर्शिदाबाद आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला, तर दक्षिण दिनापूर आणि मालदामध्ये प्रत्येकी दोन जण मरण पावले.

ज्या वेळी वीज कोसळली त्या वेळी अनेक जण आपल्या शेतात काम करीत होते. पुरुलिया जिल्ह्यात वीज कोसळण्यामुळे चार जण जखमी झाले. हवामान खात्यातर्फे प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गटामध्ये यासंदर्भात इशारा देण्यात आला होता आणि आवश्‍यक ते खबरदारी घेण्यात आली होती, असे ते म्हणाले.

Web Title: 13 killed lightning in West Bengal