दिल्लीत 'लॉ फर्म'वर छापा, 13.5 कोटींची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : देशभरात विविध ठिकाणांवर सुरू असलेले छापासत्र आज सलग दुसऱ्या दिवशी कायम होते. दिल्लीच्या आग्नेय भागातील एका "लॉ फर्म' शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 13.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून, यामध्ये 2.6 कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या आहेत अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. "टी अँड टी' या "लॉ फर्म'वर शनिवारी रात्री शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

नवी दिल्ली : देशभरात विविध ठिकाणांवर सुरू असलेले छापासत्र आज सलग दुसऱ्या दिवशी कायम होते. दिल्लीच्या आग्नेय भागातील एका "लॉ फर्म' शहर पोलिसांनी छापा टाकून जवळपास 13.5 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून, यामध्ये 2.6 कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या आहेत अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. "टी अँड टी' या "लॉ फर्म'वर शनिवारी रात्री शहर पोलिसांनी ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेल्या रकमेत सात कोटी रुपयांच्या एक हजारांच्या नोटांचाही समावेश आहे. पोलिसांनी ही कारवाई केली त्या वेळी ही खोली बंद होती; तसेच तिच्या देखभालीसाठी नेमण्यात आलेला नोकरही त्या वेळी उपस्थित होता. पोलिसांनी हे प्रकरण पुढील तपासासाठी प्राप्तिकर विभागाकडे सुपूर्त केले असून ही "लॉ फर्म' रोहित टंडन यांच्या मालकीची आहे. मध्यंतरी प्राप्तिकर विभागाने टंडन यांच्याविरोधात कारवाई केल्यानंतर त्यांनी आपली संपत्ती सव्वाशे कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते.

चेन्नईमध्ये छापासत्र सुरूच
चेन्नईमधील प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आज सलग चौथ्या दिवशी सुरूच होते. वेल्लोर आणि चेन्नई शहरातील तीन उद्योगपतींच्या घरांवर छापे टाकण्यात आले. वेल्लोरमधून दोन गाड्या, रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण रात्र लागली अशी माहिती सूत्रांनी दिली. जे. शेखर रेड्डी, श्रीनिवासलू रेड्डी आणि प्रेम यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. रेड्डी बंधूंनी नेमक्‍या कोणत्या बॅंक खात्यांचा वापर करून काळा पैसा पांढरा केला याचा प्राप्तिकर विभाग तपास करत आहे.

नाईकच्या अटकेने रेड्डी अडचणीत
बंगळूर : मंड्या जिल्हा पोलिसांनी रविवारी वरिष्ठ अधिकारी भीमा नाईक यांना आज चालक रमेश गौडा यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केली. रमेश गौडा याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये खाण सम्राट जनार्दन रेड्डींच्या मुलीच्या लग्नासाठी शंभर कोटी रुपये पांढरे करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे म्हटले होते. गौडा यांच्या अटकेमुळे जनार्दन रेड्डींच्या अडचणी वाढल्या आहेत. रमेशने 6 डिसेंबर रोजी मद्दूर येथील लॉजवर विषप्राशन करून आत्महत्या केली होती. विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नाईक यांच्या गैरकृत्यांची माहितीच रमेशने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रामध्ये दिली आहे. रमेशच्या पत्रामध्ये जनार्दन रेड्डी आणि भाजप खासदार श्रीरामलू यांच्या भेटीचाही उल्लेख आहे.
 

Web Title: 13.5 crore siezed from delhi law firm