जहांगीरपुरीतील दंगलीबद्दल १४ जण अटकेत

हिंसाचारानंतर राष्ट्रीय राजधानीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14 arrested Jahangirpuri riots Increased security national capital after violence
14 arrested Jahangirpuri riots Increased security national capital after violencesakal

नवी दिल्ली : दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे. राजधानीत अन्य कुठेही या घटनेचे पडसाद उमटू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वच जिल्ह्यांमध्ये पोलिस सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. हिंदू-मुस्लिम समाजातील नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पोलिस यंत्रणेनेही केले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये हिंसाचाराला चिथावणी देणारा अन्सार आणि गोळीबार करणाऱ्या अस्लमसह सर्व १४ आरोपींची ओळख पटली आहे. ते जहांगीरपुरीचे रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शनिवारी काही वाहनेही जाळण्यात आली. हिंसाचारात पोलिस उपनिरीक्षकासह एकूण नऊ जण जखमी झाले. गोळीबारात एक पोलिस निरीक्षक जखमी झाला. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी व्हिडिओ, सीसीटीव्ही आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने उर्वरित आरोपींना शोधण्यास सुरवात केली आहे. तसेच संबंधितांवर हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारी कट, दंगल आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

राजकारण सुरु

दिल्लीतील दंगलीवरून राजकारण सुरू झाले आहे. पिस्तूल हातात घेऊन गोळीबार करणाऱ्याला अटक झाली असेल, भगवे वस्त्र घेऊन मिरवणुकीत तलवारी नाचविणाऱ्या लोकांना अटक का केली जात नाही, अशी विचारणा काँग्रेसचे प्रवक्ते मुकेश शर्मा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com