रामकथेदरम्यान मंडप कोसळला; 14 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

- अनेकांचा झाला गुदमरून मृत्यू

- तर काहींना बसला विद्युत प्रवाहाचा धक्का.

नवी दिल्ली : राजस्थानमधील बाडमेर येथे रामकथेचा कार्यक्रम सुरू असताना मंडप कोसळून मोठी दुर्घटना घडली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला तर 40 हून अधिक जण जखमी झाले. 

बाडमेरमध्ये रामकथेचा कार्यक्रम सुरु होता. त्यादरम्यान वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस सुरु झाला. त्यामुळे मंडपातील काही भागात विद्युत प्रवाह उतरला होता. तसेच हा मंडप अनेकांच्या अंगावरही कोसळला. अचानकपणे मंडप कोसळल्याने घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळादरम्यान अनेकांचा मंडपाखाली गुदमरून मृत्यू झाला तर काही जणांना विद्युत प्रवाहाचा मोठा धक्का बसल्याने प्राण गेल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दुःख व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 dead and around 40 injured after a pandaal collapsed in Barmer