छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

सुकमा (छत्तीसगड): सुकमा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये आज (सोमवार) चकमक उडाली असून, या चकमकीत 14 नक्षलवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कोंता भागामध्ये नक्षलवाद्यांविरोधात आज सकाळी कारवाई करण्यात आली. यावेळी छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी नक्षलवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असून, नक्षलवाद्यांविरोधात कारवाई अद्यापही सुरू आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांना नक्षलविरोधी कारवाईत मोठे यश मानले जात आहे.

Web Title: 14 Maoists reportedly killed Sukma district in Chhattisgarh