जगातील टॉप 15 प्रदुषित शहरात भारताच्या 14 शहरांचा समावेश

14 out of world 15 most polluted cities in India reported by WHO
14 out of world 15 most polluted cities in India reported by WHO

विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे. 

देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या यादीत दिल्ली सहाव्या क्रमांकावर आहे. प्रदुषित शहरांची ही यादी 2016 ची आहे. WHO च्या माहितीसंग्रहानुसार, 2010 ते 2014 या दरम्यान दिल्लीतील प्रदुषाची स्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आली होती. पण 2015 मध्ये दिल्लीतील प्रदुषण पुन्हा एकदा नियंत्रणाबाहेर गेले. 

2.5 पीएम (फाइन पर्टिकु्लर मीटर) लक्षात घेता 100 देशातील 4000 शहरांच्या संशोधनानंतर हे आकडे समोर आले आहेत. 2010 मध्ये WHO ने प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली तेव्हा दिल्ली अग्रस्थानी होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानातील पेशावर व रावळपिंडी ही शहरे होती. यावेळी अग्रस्थानी पाकिस्तान आणि चीनच्या कोणत्याच शहरांचा समावेश नाही.

प्रदुषणाचे पहिले 15 शहर
1. कानपुर (173 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
2. फरीदाबाद (172 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
3. वाराणसी (151 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
4. गया (149 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
5. पटना ( 144 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
6. दिल्ली (143 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
7. लखनऊ (138 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
8. आग्रा (131 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
9. मुजफ्फरपुर ( 120 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
10. श्रीनगर (113 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
11. गुरुग्राम (113 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
12. जयपुर (105 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
13. पटियाला (101 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
14. जोधपुर (98 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)
15. अली सुबाह अल सलीम (कुवैत) (94 माइक्रोग्राम/ क्यूबिक मीटर)

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com