मुलीच्या हत्येप्रकरणी झारखंडमध्ये 14 जणांना अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

छात्रा (झारखंड) : मुलीवर बलात्कार करून काल तिला जाळून मारल्याप्रकरणी छात्रा जिल्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी आज दिली.

छात्रा (झारखंड) : मुलीवर बलात्कार करून काल तिला जाळून मारल्याप्रकरणी छात्रा जिल्ह्यात 14 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी आज दिली.

याबाबत पोलिसांनी सांगितले, की पीडित मुलीला काल जाळल्यानंतर तातडीने येथील जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेत सहभागी असलेल्या 14 जणांना काल रात्री अटक करण्यात आली, असे छात्राचे उपायुक्त जितेंद्रकुमार सिंह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या प्रकरणातील मुख्य आरोपी धनू भुइयान याच्यासह अन्य सहा जणांचा शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सिंह यांनी सांगितले. झारखंडचे मुख्यमंत्री रघुवीर दास यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यासंदर्भात काढलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, की या घटनेमुळे आपल्याला मोठा धक्का बसला. समाजात अशा प्रकारच्या घटनांना कोणतीही जागा नाही.

Web Title: 14 people arrested in Jharkhand for girls murder