अहमदाबादेत जगन्नाथाची 141 वी रथयात्रा

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जुलै 2018

जगन्नाथाच्या 141 व्या रथयात्रेला शनिवारी आषाढ बिजेच्या मुहूर्तावर अहमदाबादमध्ये प्रारंभ झाला. देवाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेच्या 18 कि.मी. मार्गावर लाखो भाविक उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या हस्ते "पहिंड विधी' पार पडला. या जगन्नाथाचा रथ ज्या मार्गावरून जाणार असतो, तो मार्ग सोन्याच्या झाडूने प्रतीकात्मकरूपात स्वच्छ करण्याचा प्रघात आहे. जमलपुरा भागातील 400 वर्षे पुरातन जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र व बहीण सुभद्रा यांचे रथ बाहेर पडले व रथयात्रेला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त भाविकांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने भारत विकासाचा मोठा टप्पा गाठेल, अशी आशाही व्यक्त केली. 

अहमदाबाद - जगन्नाथाच्या 141 व्या रथयात्रेला शनिवारी आषाढ बिजेच्या मुहूर्तावर अहमदाबादमध्ये प्रारंभ झाला. देवाचे दर्शन घेण्यासाठी यात्रेच्या 18 कि.मी. मार्गावर लाखो भाविक उपस्थित होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी व उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या हस्ते "पहिंड विधी' पार पडला. या जगन्नाथाचा रथ ज्या मार्गावरून जाणार असतो, तो मार्ग सोन्याच्या झाडूने प्रतीकात्मकरूपात स्वच्छ करण्याचा प्रघात आहे. जमलपुरा भागातील 400 वर्षे पुरातन जगन्नाथ मंदिरातून जगन्नाथ, त्यांचे बंधू बलभद्र व बहीण सुभद्रा यांचे रथ बाहेर पडले व रथयात्रेला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त भाविकांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने भारत विकासाचा मोठा टप्पा गाठेल, अशी आशाही व्यक्त केली. 

वार्षिक रथयात्रेला सुरवात होण्यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज पहाटे मंदिरात देवतांची पूजा केली. रथयात्रेत तिन्ही देवतांच्या रथांबरोबर सजविलेले 18 हत्ती, विविध चित्रकृती ठेवलेले 101 ट्रक, 30 धार्मिक गट व गायकांची 18 पथके यांचा समावेश आहे. 

Web Title: 141st Jagannath Yatra Starts From Today in ahemadabad