राजधानीत टेम्पोमध्ये आढळले 15 बैल मृतावस्थेत

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः दक्षिण दिल्लीमधील वसंत कुंज भागामधील राष्ट्रीय महामार्ग 8 वर एका टेम्पोमध्ये 15 बैल मृतावस्थेत आढळून आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग 8 वर एक टेम्पो उभा असून, त्यामधून वास येत असल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर टेम्पोमध्ये 15 बैल मृतावस्थेत आढळून आले. टेम्पो सोडून चालक फरार झाला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक व टेम्पोच्या मालकाचा शोध सुरू आहे.

टेम्पोमधील कमी जागेत 15 बैल ठेवण्यात आले होते. चेंगरून बैलांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. मृत्युमुखी पडलेल्या बैलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जनावरांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अहवाल हाती आल्यानंतर माहिती समजू शकेल, असेही पोलिसांनी सांगितले.

Web Title: 15 dead oxen found in parked truck at Delhi