15 भारतीय एव्हरेस्टवर अडकले, स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

गिर्यारोहणासाठी गेलेले 15 भारतीय एव्हरेस्ट शिखरावर अडकले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा यांच्याकडे ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली आहे. सुषमा स्वराज यांनीही या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या.

काठमांडू : गिर्यारोहणासाठी गेलेले 15 भारतीय एव्हरेस्ट शिखरावर अडकले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा यांच्याकडे ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली आहे. सुषमा स्वराज यांनीही या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या. नेपाळमधील भारतीय दुतावासातील अधिकारी मनजीव सिंह पुरी यांच्याशी संपर्क साधून या घटनेकडे तातडीने लक्ष देण्यास सांगितले. "आम्ही 15 भारतीय लुकलाममध्ये अडकलो आहोत. आम्हाला मदतीची गरज आहे. स्थानिक दुतावासापासून आम्हाला कसलीही मदत मिळू शकलेली नाही." अशा प्रकारचे ट्टिवर अमित थढानी या गिर्यारोहकाने शनिवारी परराष्ट्र मंत्रालय व सुषमा स्वराज यांच्या ट्विटर हॅंडेलला टॅक केले होते.

याची दखल घेऊन स्वराज यांनी तातडीने पावले उचचली आहेत.
एव्हरेस्ट भागातील हवामान मागील काही दिवसांपासून खराब झाले आहे. त्यामुळे सर्व विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. हे भारतीय मागील तिन दिवसांपासून एव्हरेस्टवर अडकले आहेत.
 

Web Title: 15 Indians stuck in everest