जयपूर बालसुधारगृहातून 15 जण पळाले

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

जयपूर- येथील ट्रान्सपोर्टनगरमधील बालसुधारगृहातून पंधराजण पळून गेले असून, याप्रकरणी प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. 

बालसुधारगृहाचे मुख्य प्रवेशद्वार मंगळवारी संध्याकाळी उघडे असताना बालगुन्हेगार तिथून पळून गेले. हजेरी घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 
'याबाबत बालसुधारगृहाच्या अधीक्षकांनी तक्रार दाखल केली असून, पलायन केलेल्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे,' असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने त्या बालगुन्हेगारांना या बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याने या घटनेसंबंधीची माहिती पडताळण्यात येत असल्याचे सांगितले. 
 
Web Title: 15 inmates escape from juvenile home in Rajasthan