दीड लाख भाविकांची अमरनाथसाठी नोंदणी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

दक्षिण काश्‍मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी या वर्षी आतापर्यंत 1.70 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. 60 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ 28 जूनपासून होणार आहे. 
 

जम्मू - दक्षिण काश्‍मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी या वर्षी आतापर्यंत 1.70 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. 60 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा प्रारंभ 28 जूनपासून होणार आहे. 

यात्रेच्या नोंदणीसाठी देशभरात केंद्र उभारली असून, 1.70 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. नावनोंदणी जोमाने सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या यात्रेकरूंपैकी दोन हजार 122 जण परदेशी पर्यटक असून, 1.39 लाख भाविक भारतीय आहेत. यातील 28 हजार 516 जणांनी हेलिकॉप्टरसाठी नोंदणी केली आहे. यंदा यात्रेचा कालावधी 28 जून ते 26 ऑगस्ट असा आहे. यासाठी नाननोंदणी 1 मार्चपासून सुरू झाली आहे. 

Web Title: 1.5 lakh devotees ragistration for amaranth yatra