आई आजारी असल्याचं सांगून 15 वर्षाच्या मुलीवर वीटभट्टीत बलात्कार

Haryana Crime News
Haryana Crime Newsesakal
Summary

हथीन गावातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

हथीन : हरियाणातील (Haryana Crime) हथीन गावातून (Hathin Village) एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आलाय. पाच आरोपींनी मुलीला वीटभट्टीवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केलाय. मुलीनं प्रतिकार केला असता, पीडितेला मारहाण करण्यात आलीय. आई आजारी असल्याचं आरोपीनं मुलीला सांगितलं आणि तिला आईकडं नेण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवून वीटभट्टीवर नेलं. ही घटना 5 एप्रिल रोजी रात्री घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी (Police) वीटभट्टीच्या मालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यातील एक आरोपी फरार आहे.

पोलीस स्टेशन प्रभारी कैलाश चंद यांनी सांगितलं की, पीडितेचे आई-वडील एकाच वीटभट्टीवर काम करतात. हे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून जवळच्या गावात राहत आहे. दरम्यान, 5 एप्रिलला रात्री त्यांची 15 वर्षांची मुलगी घरात एकटीच होती. त्या रात्री 12 वाजता चार जण त्यांच्या घरी आले आणि त्यांनी आईची प्रकृती खराब असल्याचं सांगितलं. आम्ही तुला तुझ्या आजारी आईकडं सोडवू, असं सांगून त्यांनी मुलीचं अपहरण करून तिला वीटभट्टीवर नेलं. इथं तिला मारहाण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दरम्यान, कुटुंबीयांनी पीडितेचा शोध सुरू केला. कुटुंबातील सदस्य वीटभट्टीवर पोहोचले. त्यांना पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला.

Haryana Crime News
'गुरमीत राम रहीम कट्टर कैद्यांमध्ये मोड नाही, म्हणून त्याला पॅरोल'

कैलाश चंद पुढं म्हणाले, नूह गावातील रहिवासी उस्मान, अलीम, युनूस, मूलचंद आणि मुनीम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाचव्या व्यक्तीचं नाव पीडितेच्या कुटुंबीयांना माहीत नाहीय. तो हजर खानचा मुलगा असल्याचं सांगितलं जातंय. त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, असं त्यांनी नमूद केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com