मध्य प्रदेशात मोठी दुर्घटना; 150 किलोंचा सिलिंडर कोसळला

Gas
Gas

इंदूर : मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील इंदूर खंडपीठाच्या मुख्य भवन परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. या परिसरात दीड क्विंटल म्हणजे जवळपास 150 किलो वजनाच्या गॅसचा सिलिंडर अचानक खाली पडला. या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले. जखमी झालेले सर्व कर्मचारी अग्निशमन दलामध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली जात आहे.

इंदूर खंडपीठाच्या मुख्य भवन परिसरात ही दुर्घटना घडल्याने येथील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले. याबाबत पोलिस अधीक्षक बीपीएस परिहार यांनी सांगितले, की एमजी रोड येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य भवनमध्ये हा दीडशे किलोंचा गॅसचा सिलिंडर ठेवण्यात आला होता. काही कर्मचारी सिलिंडर एका भिंतीवर लावत होते. मात्र, हा सिलिंडर उंचीवरून खाली पडला. यामध्ये एका कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाली. तर इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. यातील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.  

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची चर्चा

या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हा सिलिंडर पडल्यानंतर मोठा आवाजही झाला होता. त्यामुळे अनेक चर्चा सुरु होत्या. त्यामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, या वृत्ताचे खंडन करण्यात आले.

मोठा आवाज झाला

या घटनेदरम्यान उपस्थित असलेले वकिल मनीष यादव यांनी सांगितले, की मला अचानक मोठ्या तीव्रतेचा आवाज जाणवला. त्यामुळे परिसरात पूर्णत: शांतता पसरली होती. परिसरातील लोकांची पळापळ सुरु होती. सर्व माहिती घेतल्यानंतर याबाबतची माहिती मिळाली.  

50 वकील उपस्थित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश प्रकरणांची सुनावणी ऑनलाईनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी नव्हती. परंतु, उच्च न्यायालय परिसरात झालेल्या दुर्घटनेदरम्यान चार व्हिडिओ कॉन्फरन्स हॉलमध्ये एकूण 50 वकील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com