अपघातास नवज्योत कौर जबाबदार असल्याचा आरोप 

पीटीआय
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

मुझफ्फरपूर (पीटीआय) : अमृतसर रेल्वे दुर्घटनेची धग ही मुझफ्फरनगर न्यायालयापर्यंत पोचली असून, कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नवज्योतसिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू आणि संयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारी तक्रार बिहार न्यायालयात दाखल झाली. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्‍मी यांनी या अपघातप्रकरणी नवज्योत कौर सिद्धू आणि संयोजक समितीला जबाबदार धरले आहे. 

हाश्‍मी यांनी दाखल केलेल्या याचिकेत आयोजक समिती आणि नवज्योत कौर सिद्धू यांच्याविरुद्ध खटला दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. या लोकांमुळेच रावणदहनाच्या कार्यक्रमासाठी गर्दी जमली होती. कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणा तैनात होती; परंतु ती नवज्योत कौर यांच्यासाठी होती, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे लोहमार्गावर गर्दी जमली आणि त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सुरक्षा दलाचे लक्ष हे नागरिकांच्या सुरक्षेऐवजी सिद्धू यांच्याकडेच अधिक होते, असा आरोप करण्यात आला आहे. 

अमरिंदर सिंग यांचा इस्त्राईलवरून आढावा 

अमृतसर दुर्घटनेतील जखमी आणि बळींच्या स्थितीबाबत आज मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी इस्त्राईलवरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने मदतकार्याचा आढावा घेतला. अमरिंदर सिंग सध्या इस्त्राईल दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी तेल अविव येथून पंजाबच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. पीडितांना तातडीने पाच लाखांची मदत पोचवण्याचे निर्देशही त्यांनी या वेळी दिले. या बैठकीला मुख्य सचिव सुरेश कुमार, अमृतसरचे उपायुक्त कमलदीप संघा यांनी जोडा फाटक दुर्घटनेतील स्थितीची आणि मदतीची माहिती दिली. अपघातातील 59 बळींपैकी एक वगळता सर्वांची ओळख पटली असल्याची माहिती या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आपत्कालीन मदत गट स्थापन झाल्याचे सांगण्यात आले. हा गट अपघातातील जखमींना आणि मृतांच्या नातेवाइकांना गरजेच्या वस्तू देण्यासाठी मदत करत असल्याचे नमूद केले.