केरळमधील मुसळधार पावसाने 16 जण मृत्युमुखी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

गेल्या 29 मेपासून केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 16 जण मरण पावले असून, सहा कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूलमंत्री इ. चंद्रशेखरन यांनी आज विधानसभेत सांगितले.

तिरुअनंतपूरम : गेल्या 29 मेपासून केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 16 जण मरण पावले असून, सहा कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, असे महसूलमंत्री इ. चंद्रशेखरन यांनी आज विधानसभेत सांगितले.

प्राथमिक अंदाजानुसार एक हजार 109 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. तर, 61 घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, 33 कुटुंबांतील 122 नागरिकांना मदत शिबिरात हलविण्यात आले आहे. या पावसामुळे 188.41 हेक्‍टरमधील शेतीचे सहा कोटी 34 लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

त्याशिवाय, विरोधी पक्षाचे नेते रमेश चेन्नीथाला म्हणाले, की या पावसाचा दोन हजार 784 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे मरण पावलेल्यांच्या नातेवाइकांना राज्य आपत्ती निवारण निधीतून चार लाख रुपये देण्यात येणार आहेत. 

Web Title: 16 dead in rain-related incidents in Kerala

टॅग्स