जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 16 जखमी

वृत्तसंस्था
सोमवार, 4 जून 2018

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवार) गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बाँब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, मोठी गर्दी असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही जखमी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांना अटक करण्यासाठी शोधमोहिम सुरु आहे. गेल्या आठवड्यापासून दहशतवाद्यांनी अनेकदा सुरक्षा रक्षकांना लक्ष्य केले आहे.
 
दरम्यान, अखनूर भागात आज पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यांना त्यांनी लक्ष्य केले. याच भागात पाकिस्तानने रविवारी (ता. 3) केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले होते. काल कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्‍टरमध्ये घुसखोरी उधळून लावताना एक दहशतवादी मारला गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी आजूबाजूच्या जंगलांमध्ये मोठी शोधमोहिम उघडली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेली अत्याधुनिक स्फोटके शोधून निष्क्रीय केल्याने मोठी दुर्घटना टळली. दहशतवाद्यांनी मुख्य रस्त्यावरच स्फोटके पेरून ठेवली होती. पोलिसांनी तातडीने हा भाग रहदारीसाठी बंद करत सर्व भागाची तपासणी केली.

Web Title: 16 injured in grenade attack in J&K's Shopian