दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सोळा जण जखमी

16 injured in16 injured in grenade attack in J&K's Shopian grenade attack in J&K's Shopian
16 injured in16 injured in grenade attack in J&K's Shopian grenade attack in J&K's Shopian

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियॉं जिल्ह्यात आज गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉंब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, गर्दी बरीच असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही जखमी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांना अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. गेल्या आठवड्यापासून दहशतवाद्यांनी अनेकदा सुरक्षारक्षकांना लक्ष्य केले आहे. 

दरम्यान, अखनूर भागात आज पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. सीमेवरील भारतीय लष्करी ठाण्यांना त्यांनी लक्ष्य केले. याच भागात पाकिस्तानने काल (ता. 3) केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान हुतात्मा झाले होते. काल कुपवाडा जिल्ह्यातील केरान सेक्‍टरमध्ये घुसखोरी उधळून लावताना एक दहशतवादी मारला गेल्यानंतर सुरक्षारक्षकांनी आजूबाजूच्या जंगलांमध्ये मोठी शोधमोहीम उघडली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातही सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेली अत्याधुनिक स्फोटके शोधून निष्क्रिय केल्याने मोठी दुर्घटना टळली. दहशतवाद्यांनी मुख्य रस्त्यावरच स्फोटके पेरून ठेवली होती. पोलिसांनी तातडीने हा भाग रहदारीसाठी बंद करत सर्व भागाची तपासणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com