16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून जिवंत जाळले

वृत्तसंस्था
शनिवार, 5 मे 2018

राजातेंदुवा गावात राहणारी पीडित मुलगी तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी येथे आली होती. त्यादरम्यान यातील आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने जंगल परिसरात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला.

रांची : एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिला तिच्याच कुटुंबियांसमोर जाळून मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार झारखंडमधील छत्रा जिल्ह्यात घडला. छत्रा जिल्ह्यातील राजातेंदुवा गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राजातेंदुवा गावात राहणारी पीडित मुलगी तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी येथे आली होती. त्यादरम्यान यातील आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने जंगल परिसरात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत पोलिस महानिरीक्षक आशिष बत्रा यांनी सांगितले, की ही बलात्काराची ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक पंचायतीसमोर हे प्रकरण मांडण्यात आले. त्यानंतर याप्रकरणात पाचही जण दोषी आढळल्यानंतर गावातील काही नेत्यांनी त्या आरोपींना 50 हजारांचा दंड ठोठावला. 

rape

त्यानंतर संतप्त झालेल्या संशयित आरोपीने पंचायत सदस्य आणि कुटुंबियातील सदस्यांसोबत वादावादी झाली. त्यानंतर आरोपी पीडित मुलीच्या घरी गेला आणि त्याने पीडित मुलीचे घर जाळले. या भीषण आगीत पीडित मुलीचा मृत्यू झाला. 

दरम्यान, यातील आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, फरार आरोपींना शोधण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई केली जात आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

Web Title: A 16 year old girl was gangraped and burned alive