सावत्र भावाकडून बलात्कारानंतर तिने दिला मुलीला जन्म

वृत्तसंस्था
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

सावत्र बहिणीवरच बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. बलात्कार झाल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. त्या गर्भवती मुलीचे वय 16 वर्षे तर आरोपीचे वय 17 वर्षे आहे.

चंदीगढ : सावत्र बहिणीवरच बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. बलात्कार झाल्यानंतर ती गर्भवती राहिली आणि तिने एका मुलीला जन्म दिला. त्या गर्भवती मुलीचे वय 16 वर्षे तर आरोपीचे वय 17 वर्षे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगढ सेक्टर 23 मधील एका घराच्या बाहेर, एका नवजात बालिका दिसून आली. त्यावेळी, तेथील रहिवाशांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. यादरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, या मुलीवर एक वर्षापूर्वी बलात्कार केला होता. मुलीच्या आईलासुद्धा ही गोष्ट माहिती होती. 

पिडीत मुलीने माहिती देताना स्पष्ट सांगितले आहे की, तिच्या सावत्र भावाने तिच्यावर बलात्कार केल्यानेच ती गर्भवती राहिली होती. 29 जुलै रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. त्यावेळी तिच्या घरचे त्या मुलीला अनाथालयात सोडण्यासाठी गेले होते परंतु, अनाथ आश्रम न मिळाल्याने त्यांनी तिला एका घराच्या बाहेर ठेवले आणि ते परत आले.

Web Title: 16 year old mother of abandoned baby found in Chandigarh was raped by brother