Tik Tok स्टार सियाची गळफास घेऊन आत्महत्या

वृत्तसंस्था
Friday, 26 June 2020

- 16 वर्षीय सियाची राहत्या घरी आत्महत्या.

नवी दिल्ली : एका 16 वर्षीय टिकटॉक स्टारने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी टिकटॉकची कंटेट क्रिएटर होती. तिने शाहदरा येथील घरात आत्महत्या केली. या मुलीच्या वडिलांनी तिचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

याबाबत शाहदराचे पोलिस उपायुक्त अमित शर्मा यांनी सांगितले, की या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. त्या मुलीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबतची माहिती अद्याप मिळाली नाही. तसेच कोणतीही सुसाईड नोटही मिळाली नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. या मुलीचे शवविच्छेदन गुरुवारी करण्यात आले होते. त्यानंतर मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे देण्यात आला. 

बिहारमध्ये वादळाचा कहर! वीज कोसळून 83 लोक ठार

दरम्यान, या स्टारचे टिकटॉकवर लाखो फॅन्स् आहेत. तर काही लाखांहून अधिक फॅन्स् इन्स्टाग्रामवरही आहेत. आत्महत्येपूर्वी तिने एक छोटासा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यामध्ये तिने पंजाबी गाण्यावर नृत्य केले होते.

Tiktok Star Siya Kakkar

सध्या संबंधित मुलीच्या कुटुंबियांचा जबाब घेतला आहे. मात्र, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल त्या मुलीने का उचलले याबाबत तिच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले जात आहे.

सिया कक्कड असे टिकटॉक स्टारचे नाव 

सिया कक्कड असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून, ती 16 वर्षांची होती. सिया ही गेल्या काही दिवसांपासून तणावात होती. मात्र, त्यामागचे कारण काय याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. 

पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली

सिया कक्कडने आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासणी सुरु केली. त्यादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. 

Tiktok

सोशल मीडियावर मिळत होत्या धमक्या

सिया कक्कड सोशल मीडिया सातत्याने अॅक्टिव्ह होती. तिचे काही लाखात फॉलोवर्स आहेत. त्यातच तिला काही धमक्याही मिळत होत्या, अशी माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 16 years old popular TikTok content creator siya kakkar dies by suicide at home in Delhi