पेट्रोल दरवाढीचा 'सोळावा'

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

सलग सोळाव्या दिवशी इंधन दरात वाढ होत असून दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.43 प्रति लीटर, तर मुंबईमध्ये 86.24 प्रति लीटर झाले आहेत. याशिवाय डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली असून दिल्लीमध्ये हे दर 69.31 प्रति लीटर, तर मुंबईमध्ये 73.79 प्रति लीटर करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : पेट्रोल दरवाढीचा भडका हा दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावत आहे. दररोजच्या दरवाढीमुळे सामान्य जनतेचे दर महिन्याचे बजेट कोलमडत आहे. इंधनाच्या दरवाढ कमी करण्यावर सोळा दिवसांपूर्वी दिलेली केंद्रिय पातळीवरील आश्वासने पोकळ ठरत आहे.

सलग सोळाव्या दिवशी इंधन दरात वाढ होत असून दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 78.43 प्रति लीटर, तर मुंबईमध्ये 86.24 प्रति लीटर झाले आहेत. याशिवाय डिझेलच्या किंमतीतही वाढ झाली असून दिल्लीमध्ये हे दर 69.31 प्रति लीटर, तर मुंबईमध्ये 73.79 प्रति लीटर करण्यात आले आहे.

या दरम्यान, आयजीएलने सोमवारी (ता. 28) दिल्ली व आसपासच्या भागांत सीएनजी गॅस दरात वाढ केली आहे. यामध्ये नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गाझियाबाद यांचा समावेश आहे. दिल्लीत सीएनजीचे दर 1.36 प्रति किलो, तर नॉएडा, ग्रेटर नॉएडा, गाझियाबाद येथे हे दर 1.55 प्रति किलो करण्यात आले आहेत.  

या दररोजच्या इंधनवाढीमुळे तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी कोलकत्यातील गांधी मूर्ती येथे दुपारी इंधन दर वाढीचा निषेध करणार आहेत.

 dharmendra pradhan

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यापूर्वी आश्वासन दिले होते की, 'परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी इंधन दर वाढीवर लवकरात लवकर उपाययोजना अवलंबण्यात येतील. इंधन पुरवणाऱ्या देशांमध्ये इंधनसाठा कमी असल्यामुळे आणि जागतिक स्तरावर कच्चा तेलाच्या किंमती वाढल्यामुळे बाजारातील पेट्रोल व डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे." तर एप्रिलमध्ये प्रधान यांनी सांगितले होते की, 'पेट्रोलियम उत्पादने वस्तू व सेवा कराच्या कक्षेत आणण्यासाठी विचार करण्यात येणार आहे.'

Web Title: on 16th day petrol diesel prices increasing