नवजात बाळाला कचऱयात टाकून देताना दोघेही रडत होते...

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

एका अल्पवयीन मुलगीने मुलाला जन्म दिला. घरच्यांना कळू नये म्हणून बाळाला एका पिशवित ठेवले अन् कचराकुंडीत टाकून दिले. बाळाला टाकून देताना दोघेही रडत होते. जड पावलांनी ती माघारी गेली. बाळाचा आवाज एकाने ऐकला आणि पोलिसांना माहिती दिली.

सूरत (गुजरात): एका अल्पवयीन मुलगीने मुलाला जन्म दिला. घरच्यांना कळू नये म्हणून बाळाला एका पिशवित ठेवले अन् कचराकुंडीत टाकून दिले. बाळाला टाकून देताना दोघेही रडत होते. जड पावलांनी ती माघारी गेली. बाळाचा आवाज एकाने ऐकला आणि पोलिसांना माहिती दिली.

संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे उघढ झाली. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी बाळाच्या आईला अटक केली तर बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

विवाहितेला कॉलेजमधील मित्र पुन्हा भेटला अन्...

कापोदरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पिशवीमध्ये नवजात बाळाला कचराकुंडीत ठेवल्याची माहिती मिळाली. तत्काळ घटनास्थळी गेल्यानतंर बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाळाचा प्रसुतीपूर्व जन्म झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. सीसीटीव्हीच्या आधारे एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे.

अल्पवयीन मुलीचा भरचौकात लिलाव; वृद्धही रांगेत...

सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 'रेल्वे प्रवासादरम्यान एकाशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. परंतु, संबंधित व्यक्ती विवाहीत होती. आमच्या दोघांमध्ये शारिरीक संबंध आले. यामधून गर्भवती राहिले. नातेवाईकांच्या घरी राहिला असल्यामुळे घरच्यांपासून लपवले होते. पोटात कळा येऊ लागल्यानंतर बाळाला जन्म दिला. कोणाला कळू नये म्हणून एका पिशवीत बाळाला ठेवले आणि जड पावलांनी कचराकुंडीत ठेवले. आम्ही दोघेही रडत होतो. पण, तशीच माघारी फिरले होते.'

विमानतळावर महिलेसमोरच सुटला 'कंट्रोल' पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 year old arrested for abandoning her newborn baby