हैदराबादेत 17 वर्षीय मुलीवर हल्ला

हैदराबादेत 17 वर्षीय मुलीवर हल्ला

नवी दिल्ली : हैदराबाद येथे एका सतरा वर्षीय मुलीवर हल्ला करण्यात आला. ही घटना हैदराबादच्या बरकातपुरा रस्त्यावरील एका बस स्थानकावर घडली. हल्लेखोर संबंधित मुलीचा गेल्या काही दिवसांपासून पाठलाग करत होता. या पाठलागानंतर त्याने आज (बुधवार) हा हल्ला केला. या हल्ल्यानंतर संबंधित मुलीला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. 

भारत असे 19 वर्षीय हल्लेखोराचे नाव आहे. संबंधित मुलगी एका खासगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ती आज सकाळी नऊच्या सुमारास महाविद्यालयाला जाण्यासाठी बसची वाट पाहत बस थांब्यावर थांबली होती. त्यानंतर भारतने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये त्याने संबंधित मुलीच्या पोट, गळा आणि हातांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत फरार झाला आहे. संबंधित मुलीला मोठा रक्तस्त्राव सुरु होता. त्यामुळे तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 'भारत हा गेल्या काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत आहे', असे तिच्या पालकांनी सांगितले.   

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारतने मुलीच्या आईला बोलावले आणि त्यांना धमकावले होते. यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आली आहेत, असे कचेगुडा पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com