Air Strike : पाकिस्तानचं पितळ उघडे; बालाकोटमध्ये खरंच मारले गेले दहशतवादी!

वृत्तसंस्था
बुधवार, 8 मे 2019

- जैश-ए-मोहम्मदचे 170 दहशतवादी झाले ठार.

- 45 दहशतवादी जखमी. 

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्टाईकची कारवाई केली. या कारवाईत नेमके किती दहशतवादी ठार झाले याबाबतची माहिती मिळाली नाही. मात्र, आता या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 170 दहशतवादी ठार झाल्याची माहिती इटलीच्या पत्रकार फ्रॅसेसा मरिनो यांनी दिली. 

एअर स्ट्राईकच्या कारवाईत 250-300 दहशतवादी मारल्याचा दावा यापूर्वी केला जात होता. मात्र, याबाबतची अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नव्हती. त्यानंतर आता पत्रकार मरिनो यांनी याबाबत एक लेख लिहिला आहे. या लेखातून त्यांनी या सर्व बाबी उघड केल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की अनेक प्रयत्न केल्यानंतरही पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या सेनेला याबाबतचे सत्य लपवता आले नाही.

तसेच भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे 170 दहशतवादी ठार झाले तर 45 दहशतवादी जखमी झाले आहेत. या जखमी दहशतवाद्यांवर अद्यापही उपचार केले जात आहेत, असेही यामध्ये सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 170 militants killed in Balakot During Air strike