आसाम, बिहारमध्ये पुरामुळे 170 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

- उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा फटका

- आत्तापर्यंत 170 लोकांचा झाला मृत्यू. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये  मुसळधार पावसाचा फटका बसत आहे. या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात आतापर्यंत 170 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच आता झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांसह अनेक राज्यात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. 

बिहार राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. 76 लाख 85 हजारांहून अधिक लोकांना या जोरदार पावसाचा फटका बसला असून, आतापर्यंत 104 लोकांचा मृत्यू झाला. तसेच आसामच्या 29 जिल्ह्यांतील 57 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बारपेट, बक्सा आणि चिरंग या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याने जमीन वाहून गेली. साडेचार हजारांपेक्षा अधिक गावे पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा, अशी मागणी आसामच्या खासदारांनी काही दिवसांपूर्वी केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 170 Peoples Died in Assam Bihar Due to Floods