केरळमध्ये मुसळधार पाऊस; 18 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

तिरुवनअनंतपुरमः केरळमध्ये आज (गुरुवार) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, ठिकठिकाणी भूस्खलन झाले आहे. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस व भुस्खलनामुळे इदुक्की येथे 10 जणांचा, मलाप्पुरम येथे 5, कन्नूर येथे 2 व वायानाद जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तिघे जण बेप्पता आहेत.

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक घरांची पडझड झाली आहे. इदुक्की येथे घर कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळी बचाव दलाचे पथक व पोलिस दाखल झाले आहेत. मुसळधार पावसामुळे नद्या दुथडा भरून वाहू लागल्या आहेत, प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.

Web Title: 18 killed in landslides and heavy rains in Kerala