"सिमी'च्या 18 सदस्यांना सात वर्षे सश्रम कारावास

पीटीआय
बुधवार, 16 मे 2018

दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याप्रकरणी "एनआयए'च्या विशेष न्यायालयाने आज सिमी संघटनेच्या 18 सदस्यांना सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये "सिमी'चा म्होरक्‍या सफदर नागोरी याचाही समावेश आहे. 
 

कोची - दहशतवादी कारवायांसाठी शस्त्र प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्याप्रकरणी "एनआयए'च्या विशेष न्यायालयाने आज सिमी संघटनेच्या 18 सदस्यांना सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. शिक्षा सुनावलेल्यांमध्ये "सिमी'चा म्होरक्‍या सफदर नागोरी याचाही समावेश आहे. 

या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने या सर्वांना काल (ता. 14) दोषी ठरविले होते. न्यायालयाने आज शिक्षा सुनावताना त्यांना विविध कलमांअंतर्गत दोषी ठरविले. या सर्वांनी 2007 मध्ये केरळमधीळ वॅगमॉन येथे गुप्तपणे गोळीबार, स्फोटके हाताळणे, वेगाने गाडी चालविणे या प्रशिक्षणाबरोबरच "जिहाद'बाबतही व्याख्याने आयोजित केली होती. "एनआयए'ला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना तपास करून 35 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी 17 जणांना न्यायालयाने काल दोषमुक्त केले होते. आज शिक्षा सुनावलेल्या 18 जणांपैकी 14 जण सात वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांची मुक्तता होणार आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नागोरी हा "सिमी'चा संस्थापक प्रमुख आहे. 

Web Title: 18 SIMI men get 7 years rigorous imprisonment

टॅग्स