तरुणीला जळत्या निखाऱ्यावर केलं उभं, स्वयंघोषित धर्मगुरूला अटक

Telangana Girl Stan on Burning Coal
Telangana Girl Stan on Burning CoalGoogle

हैदराबाद : आजारावर उपचार म्हणून एका १८ वर्षीय तरुणीला जळत्या निखाऱ्यावर उभं केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगणातील (Telangana) विकाराबाद जिल्ह्यात ही घटना घडली असून पोलिसांनी स्वयंघोषित धर्मगुरूला अटक केली आहे.

Telangana Girl Stan on Burning Coal
मस्कवर लैंगिक छळाचे आरोप, हवाई सुंदरीला दिले अडीच लाख डॉलर : Report

विकाराबाद जिल्ह्यातील कुकिंडा गावातील पीडित विद्यार्थिनी पदवीच्या प्रथम वर्षाला शिकतेय. ती एका आजाराने ग्रस्त होती. तिच्यावर अनेक रुग्णालयात औषधोपचार करून देखील ती बरी होत नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांनी तिला नास्कल गावातील एका स्वयंघोषित धर्मगुरू रफीकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिचं कुटुंबीय तिला घेऊन त्या स्वयंघोषित धर्मगुरूकडे गेले.

रफी दर शुक्रवारी एका दर्ग्यात ‘उपचार’ शिबिर चालवत होता. यावेळी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी येतात. त्यामुळे पीडितेचे पालक देखील तिला या स्वयंघोषित धर्मगुरूकडे घेऊन गेले. ''तुमची मुलगी दुष्ट आत्म्याच्या तावडीत सापडली असून तिला यामधून बाहेर काढावे लागेल'', असं मुलीच्या आई-वडिलांना सांगत तिला जळत्या कोळशावर उभे केले. त्यामध्ये मुलगी भाजली असून तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

स्थानिक माध्यमांनी या घटनेबद्दल वृत्त दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी स्वयंघोषित धर्मगुरूला अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com