गोव्याच्या राजभवनाला 180 पर्यटकांची भेट 

180 tourists visited the Raj Bhavan in Goa
180 tourists visited the Raj Bhavan in Goa

पणजी : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना 16 व्या शतकातील वास्तुशिल्पाचा नमुना पाहण्यास मिळावा म्हणून 5 जानेवारीपासून 'राजभवन दर्शन' सुरू झाले आहे.

या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 180 पर्यटकांनी ऑनलाईन बुकिंगद्वारे राजभवनाला भेट दिली आहे. राजभवनातील प्रशासकीय विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांद्वारे राजभवन पाहण्यासाठी ऑनलाईन बुकिंग होत असून, भेट देणाऱ्या मुलांची निश्‍चित संख्या मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. गोवा राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि राजभवन यांच्या माध्यमातून हा 'राजभवन दर्शन'चा उपक्रम सुरू झाला आहे. प्रती व्यक्तीला 300 रुपये आकारले जात असून, आठवड्यातील शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस राजभवन पर्यटकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com