जम्मू आणि काश्‍मीरसाठी 19 हजार कोटींचा विकास निधी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

प्रमुख प्रकल्प आणि तरतूद (आकडे रुपयांमध्ये) 
40 हजार कोटी : पायाभूत सुविधा 
7,854 कोटी : पूरग्रस्तांना मदत आणि आपत्ती व्यवस्थापन 
2,241 कोटी : पर्यटन विकास 
11,708 कोटी : ऊर्जा प्रकल्प 
4,900 कोटी : आरोग्य सुविधा

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्‍मीरच्या विकासासाठी जाहीर केलेल्या 80 हजार कोटी निधीपैकी 19 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने राज्याकडे सुपूर्द केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विविध मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलविलेल्या बैठकीत ही माहिती सांगण्यात आली. 

जम्मू आणि काश्‍मीरमधील विविध विकास प्रकल्पांच्या कामांचा आणि त्यासाठी तरतूद केलेल्या निधीबाबतचा आढावा राजनाथसिंह यांनी आज घेतला. या वेळी, जाहीर केलेल्या एकूण निधीपैकी साधारण 25 टक्के, म्हणजे 19 हजार कोटी रुपये राज्याकडे दिले असून, त्या निधीचा उपयोग करून कामेही सुरू झाली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर, अशा विकास प्रकल्पांमुळे परिस्थिती सामान्य करण्यास हातभार लागेल, अशी आशा आहे. पंतप्रधान मोदी यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये हे विशेष पॅकेज जाहीर केले होते. 80 हजार कोटी रुपयांपैकी निम्मा निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. उर्वरित निधी पूरग्रस्तांसाठी मदतनिधी, आपत्ती व्यवस्थापन, पर्यटन विकास, ऊर्जा, आरोग्य सुविधा यांच्यासाठी वापरला जाणार आहे. 

प्रमुख प्रकल्प आणि तरतूद (आकडे रुपयांमध्ये) 
40 हजार कोटी : पायाभूत सुविधा 
7,854 कोटी : पूरग्रस्तांना मदत आणि आपत्ती व्यवस्थापन 
2,241 कोटी : पर्यटन विकास 
11,708 कोटी : ऊर्जा प्रकल्प 
4,900 कोटी : आरोग्य सुविधा

Web Title: 19 thousand Cr released from PM's Kashmir package