युवतीने 'ते' वापरून केला महिलेवर बलात्कार

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता.

नवी दिल्लीः राजधानीमध्ये एका 19 वर्षीय युवतीने 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. न्यायालयाने आरोपी तरूणीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. युवतीने बलात्कार करण्यासाठी सेक्स टॉयचा वापर केला होता.

'मी, बिझनेस प्लानमध्ये छोटे गुंतवणूकदार मिळवण्याचे काम करत होते. त्यानिमित्ताने दररोज अनेकांना भेटत असे. एक दिवस माझी भेट रोहित व राहुल यांच्याशी झाली. या दोघांनी दिल्लीतील दिलशाद कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये नेले. तेथे माझ्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. शिवाय, बलात्कार करत असतानाचा व्हिडिओही तयार केला गेला. व्हिडिओची धमकी देऊन युवती मारहाण करण्याबरोबरच सेक्स टॉयचा वापर करून माझ्यावर बलात्कार करत असे. अनेक दिवसांपासून हा अत्याचार सहन करत होते. अखेर तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे,' अशी माहिती पीडित महिलेने दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका 19 वर्षीय युवतीने सेक्स टॉयचा वापर करत बळजबरीने एका महिलेवर बलात्कार केला. शिवाय, अन्य दोघांनीही सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन युवकांसह युवतीलाही अटक करण्यात आली आहे. युवतीला न्यायालयात हजर केले असता तिला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, तिची रवानगी तिहार कारागृहात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.'

Web Title: 19 year old Woman Arrested for Raping Another Woman in First Such Case After Section 377 Verdict