लिफ्टच्या बहाण्याने 19 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

गुडगावमध्ये लिफ्टच्या बहाण्याने एका 19 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकासह इतरांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील सर्व आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

गुडगाव : बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असे असताना आता गुडगावमध्ये लिफ्टच्या बहाण्याने एका 19 वर्षीय महिलेवर रिक्षाचालकासह इतरांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यातील सर्व आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Rape

पीडित महिला सोहना येथील गावाच्या काही किलोमीटर अंतरावर होती. ती महिला रात्री 8 वाजता बसची वाट पाहत होती. मात्र, बस येण्यास उशीर झाल्याने रिक्षाचालकाने त्या महिलेला लिफ्टची ऑफर दिली होती. त्यानुसार ती महिला रिक्षामध्ये बसल्यानंतर काही अंतरावर रिक्षा गेल्यानंतर त्या रिक्षाचालकाने आपल्या मित्रांना बोलावले. त्यानंतर रिक्षाचालकाचे चार मित्र गुडगाव परिसरातील भोंडसी भागात आले. या सर्वांनी त्या महिलेला एका अज्ञातस्थळी नेले आणि तेथे त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. 

याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरारी आरोपींचा शोध घेऊन संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच यातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती गुडगाव पोलिस प्रवक्ते रविंद्र कुमार यांनी सांगितले. 

Web Title: A 19 year old woman gangrape rape for lift reasons