भारतात १९,५६९ मातृभाषा

पीटीआय
सोमवार, 2 जुलै 2018

नवी दिल्ली - भारतात १९ हजार पाचशेहून अधिक भाषा किंवा बोली या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात, अशी माहिती नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जनगणनेच्या अहवालातून समोर आली आहे. एकूण १२१ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात १२१ भाषा अशा आहेत ज्या दहा हजारांहून अधिक नागरिक बोलतात, असे अहवाल सांगतो.

भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी काही दिवसांपूर्वीच २०११च्या जनगणनेचा अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मातृभाषेची नोंद घेण्यात आली आहे. कारण कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मातृभाषा ही वेगवेगळी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे देशभरात मातृभाषा म्हणून बोलल्या जाणाऱ्या १९,५६९ भाषा किंवा बोली आहेत, असे जनगणनेतून समोर आले आहे. असे असले तरी देशातील ९६.७१ टक्के लोकसंख्येची मातृभाषा ही अनुसूचित समाविष्ट असलेल्या २२ भाषांपैकी एक आहे.  

अनुसूचित समाविष्ट नसलेल्या भाषांची संख्या २००१च्या जनगणनेत १०० होती, ती २०११च्या जनगणनेमध्ये ९९ झाली आहे. नागरिक ज्या भाषेतून किंवा बोलीतून संवाद साधतात तिची मातृभाषा म्हणून जनगणनेवेळी नोंद करण्यात आली आहे. या भाषेचे संबंधित नागरिकांना संपूर्ण ज्ञान असेलच असे नाही.

अनुसूचित समाविष्ट भाषा
आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्‍मिरी, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृती, सिंधी, तमीळ, तेलुगू, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली, डोग्री

९९ - अनुसूचित समाविष्ट नसलेल्या भाषा

Web Title: 19569 mother tongue in India